मुंबई | देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. विरोधकांकडून या गोष्टीवर आक्षेप नोंदवला आला आहे. याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला निर्देश देत पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असं सांगितले आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. फोटोवरून मोदींना सणसणीत टोला लगावला आहे.
मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील” असं म्हणत नवाब मलिक यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
प्रधानमंत्री मोदी जी तस्वीर छपाने की दौड में इतने आगे निकल गए है की सारे पेट्रोल पंप में, रेल्वे स्थानकों, एअरपोर्ट पर मोदी जी की तस्वीर है जहाँ देखे मोदी जी की तस्वीर नजर आती है।
(१/२) pic.twitter.com/aGNYBkYzUk
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 6, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.