HW News Marathi
Covid-19

केंद्राने राज्याला देण्यात येणार्‍या ऑक्सिजन कोट्यात कपात करून महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम करु नये

मुंबई | कर्नाटकातील बेल्लारी येथून देण्यात येणार्‍या ऑक्सिजन कोट्यात कपात करून केंद्राने महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम करु नये असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

राज्यासाठी कोटा निश्चित करण्यात आला असताना आता केंद्राकडून ५० टन कपात करण्यात आली आहे. याचा वापर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे व मराठवाड्यातील जिल्हयांमध्ये करता येत होता मात्र केंद्राची ही भूमिका अन्यायकारक आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

५० टन कपात केली तर कोल्हापूरमधून ११ ते १२ टन गोव्याला द्यायला सांगत आहेत. १२०० टन सरकारचे आणि ३०० टन अतिरिक्त केंद्रसरकार देते. मात्र आता बेल्लारी येथून कपात केली जाणार आहे. केंद्राने ही कपात करून अन्याय करु नये. लोकांच्या औषधोपचाराची जबाबदारी केंद्राची आहे याची जाणीव नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.

कर्नाटक आणि गोव्यात भाजपचे सरकार असल्याने तिथे जास्त लक्ष देणे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणे योग्य नाही. आमच्या गरजा असताना भाजपशासित राज्यात नेण्याची भूमिका केंद्राची योग्य नाही त्यामुळेच देशाची एकच नीती असली पाहिजे आणि ऑक्सिजनच्याबाबतीतही तीच नीती राबवावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लसीकरण फक्त स्थानिक लोकांना आधारकार्डवर देण्याची घोषणा केली आहे. मात्र कामानिमित्त त्यांची लोकं देशभर पसरली आहेत. मग इतर राज्यांनी आम्हीही लस देणार नाही अशी भूमिका घेतली तर ही माणुसकी राहिल का? असे सांगतानाच या निर्णयामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ राज्यातून १२०० जणांना झारखंडला नेण्यासाठी पहिली नॉनस्टॉप विशेष ट्रेन रवाना

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार

News Desk

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या ४७ हॉटेलवर पुण्यात कारवाई!

News Desk