मुंबई। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे राज्याच्या राजकारणात पत्रकार परिषदांच्या माध्यमातून खळबळ उडवून देतात. त्याबरोबरच एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे नवाब मलिक हे सगळ्यांना ठाऊकच आहेत. कारण मालिकांचा वानखेडेवर हल्लाबोल सुरुच आहे. आणि आजदेखील नवा ट्विटर वॉर मलिक यांच्या कडून करण्यात आला आहे. आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असं ट्वीट करत मलिक यांनी ट्विटरवरुन काही कागदपत्रं शेअर करत समीर वानखेडे यांच्यावर नवा हल्लाबोल केला आहे.
नवाब मलिक ट्विटमध्ये म्हणतात?
महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध केली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुढे नवाब मलिक म्हणतात, मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे आणि माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. असा नवा हल्लाबोल राज्य अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
एक और फर्जीवाड़ा,
अंतिम संस्कार के लिए मुसलमान और सरकारी दस्तावेज के लिए हिन्दू ?
धन्य है Dawood Dnyandeo pic.twitter.com/uuM58cjfru— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 25, 2021
हायकोर्टाचा समीर वानखेडेंना दणका, नवाब मलिकांना रोखण्यास दिला नकार
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. पण, हायकोर्टाने याचिकाच फेटाळून लावत वानखेडेंना दणका दिला आहे.समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टात याची दाखल केली होती. पण, 22 नोव्हेंबर रोजी कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही. नवाब मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, नवाब मलिक यांना यापुढे वाजवी पद्धतीने माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.