HW News Marathi
महाराष्ट्र

शुभमंगल होण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू

सांगलीः अवघ्या काही तासांववर लग्नसोहळा आला होता. नवरदेव मोठ्या उत्साहत मेकअप करण्यात व्यस्त होता. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच ठरलेले होते. नवरदेवला अचानक अस्वस्थ वाटू लागले. घामाघुम होऊन तो खाली कोसळला आणि क्षणार्धात त्याचे प्राण गेले. मनाला चटका लावणारी घटना सांगली जिल्ह्यातील मीरज येथे घडली. रवी मदन पिसे (वय २७, रा. शिवाजी पुतळा, मिरज) असे मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव आहे. त्याचे शनिवारी लग्न होते. त्यासाठी शाही दरबारात जय्यत तयारी करण्यात आली होती. दोन्हीकडील मंडळी आनंदी असताना नवरदेवाल ह्रदयविकाराचा झटका आला. शुक्रवारी हळदीचा कार्यक्रमही पार पडला होता. त्यानंतर हॉलवरून आज सकाळी तयारी करण्यासाठी नवरा मुलगा तानाजी चौकातील आपल्या घरी आला होता. साडे अकराचा लग्नाचा मुहुर्त होता. मात्र, सकाळी साडे नऊ वाजता त्याच्या छातीत जोराची कळ आली आणि तो चक्कर येऊन खाली कोसळला. या प्रकारानंतर नवऱ्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कळते. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जुन्या मंत्र्यांना डच्चु, नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान

News Desk

पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Aprna

शरद पवार ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल,लवकरचं होणार शस्त्रक्रिया

News Desk