HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेला संपविण्याचा प्रयत्न, नवीन आलेले भाऊ विष कालवत आहेत ! 

बीड | मला जग सोडून जावे असे वाटते, धनंजय मुंडेला संपविणयाचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज (२० ऑक्टोबर) घेतलेल्य पत्रकार परिषदेत केला आहे. बहिण भावाच्या नात्यात विष कालविण्याचा प्रयत्न केला जात असून ज्यांनी कुणी हे विष पेरण्याचा प्रयत्न केला त्याला जनता न्याय देईल, असे म्हणत मुंडे यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे.

भाजपमध्ये नवीन आलेले भाऊ विष कालवत असल्याचा थेट आरोप करत नाव न घेता, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “मी १७ ऑक्टोबरला केलेले भाषण १९ तारखेला व्हायरल झाले, असा सवाल धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्रकार परिषेदतून उपस्थिती केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर प्रतिक्रीया देताना भावनिक झाले आहे.

माझा आशय समजून घ्या आणि मी माझ्या बहिणीबद्दल असे बोलेन का? असा सवालही मुंडेंनी केला. मला कालपासून वाटत होते की हे जग सोडून जावे अस वाटते आहे. मलाही तीन मुली आहे. ज्या घरात महिलांचा वावर बहुसंख्येने आहे त्या घरातील बहिणी बद्दला मी असे वक्तव्य करेन का?, याचा निकाल जनताचं काय तो करेल असं धनंजय मुंडे म्हणाले. बहीण भावाच्या नात्यात जो कुणी आग लावायचा प्रयत्न केला आहे याचंच वाईट वाटतं.

 

धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

 

  • काही जनांना वाटेत की, मी राजकारण सोडावे
  • जगावे की, मरावे या मनस्थिती
  • खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे.
  • मी कोणाचेही मन दुखावेल असे कधी ही वागलो नाही
  • कल झालेला वाद हा वेदना देणार आहे
  • धनंजय मुंडेला संपविण्याचा प्रयत्न
  • ती क्लीप फॉरेन्सिक लॅबला पाठवून चौकशी कारा, असे आवाहन मुंडे यांनी केले.
  • हे १७ तारखेचे भाषण असून त्या भाषणातील क्लीप एडिट करून वापरले
  • नवीन आलेले भाऊ विष पेरत आहेत, ज्यांनी कुणी हे केलेले त्यांला जनता धडा शिकविले.
  • मला जग सोडून जावे असे वाटते
  • मी मतांचे राजकारण केले नाही
  • माध्या वक्तव्याचा विपर्यास केला
  • मला खलनायक करण्याचा प्रयत्न केला जात आहे
  • आमचे बहीण-भावाचे रक्क्ताचे नाते आहे
  • बहीण-भावाच्या नात्याला डाग लावण्याचा प्रयत्न

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर!

News Desk

देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यात पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी रवाना!

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk