HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या अंतिम निर्णय, सर्वोच्च न्यायालयात असा झाला युक्तीवाद

नवी दिल्ली | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनण्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल (२४ नोव्हेंबर) सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला बहुमताचा दावा करणारे पत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावर आज (२५ नोव्हेंबर) न्यायालयात सुनावणीला सुरुवात देखील झाली. या सुनावणीतील युक्तीवाद ऐकल्यानंतर या प्रकरणातवर उद्या (२६ नोव्हेंबर) अंतिम निर्यण येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

सर्वोच्च न्यायालयात असा झाला युक्तीवाद

  • सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी १०.३० वाजता अंतिम सुनावणी
  • आम्ही पण बहुमत चाचणीत हरायला तयार, पण बहुमत चाचणी ठरलेल्या तारखेलाच होऊ दे- तुषार मेहता
  • आजच बहुमत चाचणी घ्या, आम्ही याचिका मागे घेतो- अभिषेक मनु सिंघवी
  • तीन पक्षांना एक वकील निश्चित करता आला नाही, तुषार मेहतांच्या युक्तिवादानंतर कोर्टात हशा –
  • शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रतिज्ञापत्रे न्यायालयाने स्वीकारली नाहीत
  • आम्ही बहुमत चाचणीत पराभूत झालो तरी चालेल, पण बहुमत चाचणी आजच होऊ द्या- अभिषेक मनु सिंघवी
  • ते ५४ आमदारांचे पत्र नेतानिवडीसाठी, भाजपाच्या पाठिंब्यासाठी नाही – अभिषेक मनु सिंघवी
  • राष्ट्रवादीकडून नवीन पत्र कोर्टात सादर – हंगामी विधानसभा अध्यक्ष नेमा आजच बहुमत चाचणी घ्या – अभिषेक मनु सिंघवी
  • – सगळं काही रात्रीच्या अंधारात घडले, आता बहुमत चाचणी दिवसाउजेडी घ्या – कपिल सिब्बल
  • ५४ आमदारांच्या सह्या असतीलही, पण भाजपाला पाठिंब्याचा उल्लेख नाही, राष्ट्रवादीचा युक्तिवाद
  • राज्यपालांच्या निर्णयावर बोलायचे नाही, पण बहुमत चाचणी लवकर घ्या – सिंघवी
  • एका कारणासाठी घेतलेलं पत्र अजित पवारांनी दुसऱ्या कारणासाठी वापरले, काँग्रेस, राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवाद
  • राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचे पत्र अजित पवारांकडे होतं.. म्हणजे अजित पवारच राष्ट्रवादी; अजित पवारांचे वकील मणिंदर सिंग यांचा युक्तिवाद
  • रात्री नेमके असे काय घडले की पहाटे राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली?- कपिल सिब्बल
  • आणीबाणीच्या परिस्थितीत असे निर्णय राज्यपाल घेतात- कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
  • कित्येक दिवस संयमाने काम करणारे राज्यपाल मध्यरात्री इतके सक्रीय कसे काय झाले- कपिल सिब्बल
  • काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्ता स्थापन करण्याआधीच कशी काय राष्ट्रपती राजवट उठवली जाते?- कपिल सिब्बल
  • अशी काय राष्ट्रीय आपत्ती कोसळली होती की रातोरात राष्ट्रपती राजवट उठवली? शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा सवाल
  • राज्यपाल बघून घेतील. यात न्यायालयानं लक्ष घालू नये- तुषार मेहता, मुकूल रोहतगी यांची विनंती
  • विरोधकांना त्यांचे आमदार पळून जातील याची भीती वाटते.. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेय, असेच सुरू राहिल्यास विधानसभेचे कामकाज कसे चालणार- तुषार मेहता
  • ‘एक पवार त्यांच्याकडे, एक आमच्याकडे, त्यांच्या कौटुंबिक वादाशी देणंघेणे नाही’- भाजपाचे वकील मुकूल रोहतगी
  • मी देवेंद्र फडणवीस.. भाजपाचा विधिमंडळ गटनेता आहे.. माझ्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा आहे – तुषार मेहतांनी वाचून दाखवलं फडणवीसांनी राज्यपालांना दिलेले पत्र
  • राज्यपालांनी योग्य तेच केलं.. त्यांना काय समिती बसवायली होती का? मेहतांचा सवाल
  • अजित पवारांचे पत्र राज्यपालांना मिळालं.. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली – तुषार मेहता
  • मी अजित पवार राष्ट्रवादीचा गटनेता आहे. माझ्याकडे सर्व ५४ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे – तुषार मेहता
  • अजित पवारांनी २२ नोव्हेंबरला पत्र दिले. त्यावर ५४ आमदारांच्या सह्या होत्या – तुषार मेहता
  • बहुमतासाठी राज्यपालांनी तीन पक्षांना संधी दिली – तुषार मेहता
  • ९ नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांनी शिवसेना-भाजपाची सत्ता स्थापनेसाठी वाट पाहिली- महाधिवक्ता तुषार मेहता

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉंग ड्राईव्हला मला ‘या’ व्यक्तीसोबत जायला आवडेल – रोहित पवार

News Desk

भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी, सुधीर ढवळेंसह दोन जणांना अटक

News Desk

मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला लाज वाटायला हवी, कंगनाचे उद्धव ठाकरेंवर शरसंधान

News Desk