HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंना पुन्हा कोरोनाची लक्षणे, ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाणार?

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची पुन्हा लक्षणे जाणवत असल्याची माहिती मिळत आहे. आज (३० डिसेंबर) त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. गेल्या दोन दिवसांपासून खडसे मुंबईतल्या निवासस्थानी आहेत. लक्षणे जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरीच थांबणं पसंत केलं आहे. खडसेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे आज ते चौकशीला जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. मुंबईतल्या निवासस्थानी सोमवारी आणि मंगळवारी खडसेंनी आराम केला. दोन दिवसांपासून खडसे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत वा कुणाच्याही संपर्कात नाही. अशात खडसेंनी कोरोनाची चाचणी केलेली आहे, अद्याप रिपोर्ट येणं बाकी असल्याची माहिती कळतीये. आज रिपोर्ट येण्याचीही शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरपंचाची निवड थेट जनतेून नाही हे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर

swarit

चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करण्याची राऊतांची मागणी, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला दिले उत्तर 

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांची घेणार भेट!

News Desk