HW News Marathi
महाराष्ट्र

रोहित पवार म्हणतात,शरद पवार साहेबांच्या मनात काय हे कोणालाचं कळतं नाही!

पुणे | राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब हे नावाजलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्ष गेली अनेक वर्ष काम करत आहे. शरद पवारांची राजकारणातील कामाची पद्धत यावरुन कायमच राजकीय वर्तृळाच चर्चा सुरु असतात. या विषयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यात शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होता त्यावेळी ते बोलत होते.

रोहित पवार म्हणाले की, “मला पवार साहेब कळले आहेत. पण इथे मी काही दुरुस्ती करतो, सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी ते काय धोरण घेतील हे लोकांना कळलं . पण पवार साहेबांच्या मनात काय आहे हे कोणाला कळलं नाही आणि कदाचित पुढे जाऊनही कळणार नाही”. शरद पवारांचा ८०वा वाढदिवस संपूर्ण राज्यात उत्साहात पावर पडला होता. त्याच निमित्ताने आयोजित पारितोषिक कार्यक्रमात रोहित पवार बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हवामान खात्याचे केले कौतुक

News Desk

मेट्रो-३ च्या प्रकल्पावरुन पुन्हा एकदा फडणवीसांकडून सरकारची कानउघाडणी

News Desk

परळीतील व्यापाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी १६ सावकारांवर गुन्हा

Aprna