HW News Marathi
देश / विदेश

मोठी बातमी! शरद पवार घेणार अमित शहांची भेट!

नवी दिल्ली | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज(३ ऑगस्ट) भेट होणार आहे. दुपारी २ वाजता संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात होणार दोघांची भेट होणार आहे. य अभेटीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. नेमकं कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार आहेत आणि कोणते निर्णय घेतले जाणार आहेत यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

पवारांसोबत हे नेते असतील उपस्थित

शरद पवार आणि अमित शाह यांच्या सोबत साखर संघटनेचे नाईकनवरे, दांडेगावकरही उपस्थित असण्याची शक्यता आहे. एकीकडे जिथे संसदेत विरोधक एकमेकां विरोधात घोषणा बाजी करत आहेत, तिथे दुसरीकडी पवार आणि शाह यांच्या भेटीवरून नवीन राजनैतिक वळण येण्याचे संकेत आहेत. भाजप विरोधात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक होत असताना आता पवार आणि शहांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राहुल गांधींचा ब्रेकफास्ट डिप्लोमसी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज १४ प्रमुख विरोधी पक्षांना आज सकाळी ब्रेकफास्ट साठी आमंत्रित केलं आहे. या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ च्या माध्यमातून राहुल गांधी आज १०० हून अधिक खासदारांशी चर्चा करणार असून त्यामध्ये केंद्र सरकारला संसदेत घेरण्याची तयारी सुरु आहे. राहुल गांधींच्या या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ चे आयोजन संसदेतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित करण्यात आलं असून त्यानंतर विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस प्रकरणी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन केंद्र सरकारने संसदेत चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी देशातील ४० पत्रकार, विरोधी पक्ष नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा दावा फ्रान्सच्या एका माध्यमाने केला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संसदेत ट्रॅक्टरवरुन प्रवेश केला होता. आज त्यांनी याच मुद्द्यांवरुन ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ आखली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आमदारांची दुसरी बैठकही वगळली

News Desk

काबुलवरून निघालेलं विमान भारतात सुखरूप पोहोचलं!

News Desk

आज रात्री १०.३० वाजता जेट एअरवेजचे शेवटचे उड्डाण

News Desk