HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | एका मागून एक नेत्यांना कोरोनाची लागण होण्याने सत्र सुरुच आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.त्यांनी स्वत: ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. “काल माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन”,असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

 

महत्वाची बाब म्हणजे २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेते हजर होते. खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे अनेक जण उपस्थित होते. त्यामुळे या सगळ्यांवर देखील कोरोनाचे सावट असल्याची शक्यता नाकारतां येत नाही. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोना झाला आहे. तसेच, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोना झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आतापर्यंत ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७२ हजारांवर

News Desk

अमोल कोल्हेंचा कोरोनावरील ‘फॅबीफ्लू’ औषधाला आक्षेप, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिले पत्र

News Desk

लॉकडाऊनमध्ये राज्यात पोलिसांवर हल्ल्यांच्या तब्बल १५९ घटना

News Desk