HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची ब्राम्हण समाजाकडे दिलगिरी व्यक्त

जळगाव | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता मी ब्राम्हणाला मुख्यमंत्री पद दान केले असे वक्तव्य केले होते. त्यानंतर ब्राम्हण समाज आक्रमक झाला होता. खडसेंनी वक्तव्य मागे घ्यावे आणि ब्राम्हण समाजाची माफी मागावी अशी मागणी केली जात होती. आता एकनाथ खडसे यांनी ट्वि करत समस्त ब्राम्हण समाजाची माफी मागितली आहे.

‘६ नोव्हेंबरला मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राम्हण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राम्हण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहोचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो’, असे ट्विट एकनाथ खडसे यांनी केले आहे.

 

ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एच. डब्ल्यु मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी असे सांगितले की एकनाथ खडसे यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे नाहीतर पदवीधर निवडणुकीमध्ये ब्राम्हण समाज मतदान करणार नाही.

पुढे दवे असेही एकनाथ खडसे यांच्याशी बातचीत झाली त्यावेळी ते असे म्हणाले की माझा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. जर असं होतं तर त्यांनी फडणवीसांना दान केलं असे म्हणायला हवे होते. त्यात त्यांनी ब्राह्मणांचा उल्लेख करायला नको होता. जर राष्ट्रवादीने खडसेंना समज दिली नाही आणि त्यांनी त्यांनी शब्द मागे घेतले नाही तर पदवीधर निवडणूकीत ब्राम्हण समाज मतदान करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

एका जाहीर कार्यक्रमात दोघांमधील वादाचं कथन करताना ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं,” असं विधान खडसे यांनी केलं आहे. मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.“नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बैस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ढोल वाजवून सरकारला जाग आली नाही तर मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करु

News Desk

“आमची सत्ता असताना आता इंधन दरवाढीवरून ट्विट करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?”

News Desk

ओला इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीकडून बीड जिल्ह्यातील ग्राहकाची फसवणुकीचा आरोप

Aprna