HW News Marathi
महाराष्ट्र

आपल्यापेक्षा ताकदवान लोकांशी लढा, लहान मुलांशी लढण्यात काय गंमत !

धुळे | लढाईचे आहे तर आपल्यापेक्षा ताकदवान लोकांशी लढा, आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलांशी लढण्यात काय गंमत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेचे विरोध पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांना लगावा आहे. सुप्रिया सुळे या काल (२८ फेब्रुवारी) धुळे दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी फडणवींवर टीका केली. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “मी जेव्हा संसदेत नडे तेव्हा मंत्र्यांशी नाही नडत. मी तेव्हा अमित शहाची नडाते. टीका करायची तर अमित शहावर करायची ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. बाकीच्या मंत्र्यांना कशाला बोलायचे, केंद्रातील मंत्र्यांचे काय हाल असतात हे मला माहिती आहेत. किती फाईली कोणाकडे जातात,” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, आदित्या ठाकरे विधानसभेत उत्तर देत होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारला, मलाही आश्चर्य वाटते. एकदा नवीन निवडून आलेला नेता काही तरी करू पाहतो.आपण त्याला कधी अडवणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचे मुखमंत्री होता. एक नवी मुलगा एक युवा काही तरी करायाल बघतोय. उगाच काही तरी एशियन बँकेचा काय करणार वैगेर, उगाच तो प्रश्न, मी पण १० वर्ष खासदार आहे. एखादा नवीन मंत्री जेव्हा उभा राहतो. जर तो भाजपचा केंद्र असला तरी मी त्याला नाही नडत. कशासाठी नडू, अरे नडने का है. तो आपल्यापेक्षा ताकदवानाशी नडा.आपल्यपेक्षा लहान वयाच्या मुलात नडण्यात काय गंमत. मी जेव्हा संसदेत नडे तेव्हा मंत्र्यांशी नाही नडत. मी तेव्हा अमित शहाची नडते. टीका करायची तर अमित शहावर करायची ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. बाकीच्या मंत्र्यांना कशाला बोलायचे, केंद्रातील मंत्र्यांचे काय हाल असतात हे मला माहिती आहेत. किती फाईली कोणाकडे जातात. ते आमचेच दोस्त लोक आहेत. आमच्याचकडे येवून रडतातनंतर झाकली मुठ सव्वा लाख की, खुल गई तो खाक की, आपली दोस्ती एकतर्फ अपना काम एकतर्फ, असे सुप्रिया सुळे म्हणाले

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण

swarit

मी मुख्यमंत्री बनण्यास बिलकुल तयार नाही !

News Desk

चाकण मधील जाळपोळीत बाहेरच्या लोकांचा हात, पोलिसांचा संशय  

News Desk