HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी ‘या’ कारणासाठी शरद पवारांची भेट घेतली, राष्ट्रवादीने दिले स्पष्टीकरण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची }काल (३१ मे) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरं काही नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दुश्मनासारखे काम करत नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे व्यक्तीगत नाती टिकवली जातात शिवाय व्यक्तीगत गाठीभेटी या होत असतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करत असतो तर सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचे काम करत असतात. महाविकास आघाडी शरद पवारसाहेबांनी बनवली आहे. त्यामुळे कुणीही या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करू नये. शिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट होती असे जाहीर केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची घेतली भेट

राज्यात एकीकडे अनेक मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. अशात अनेक नेत्यांच्या गाठीभेठी सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. खासदार संभाजीराजे यांनी नुकतीच अनेक दिग्गज नेत्यांची या संदर्भात भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल (३१ मे) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रववादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

फडणवीस आणि पवार यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करत शरद पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तुर्तास तरी या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. मात्र, तरीही राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता मला वाटतं की आम्ही एकही सामना गमावणार नाही”, मोटेरा स्टेडियमवरुन मुख्यमंत्र्याचा टोला

News Desk

“भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी उपयुक्त”, – चंद्रकांत पाटील

News Desk

निदान महाराष्ट्राच्या चारित्र्यावर तरी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये!, राऊतांनी ठाकरे सरकारलाच सुनावले

News Desk