HW News Marathi
देश / विदेश

“मोदीसाहेब, पश्चिम बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल – डिझेलवर का काढताय?”,रुपाली चाकणकरांचा सवाल

मुंबई | मोदीसाहेब, पश्चिम बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल – डिझेलवर का काढताय?असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे केला आहे. दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं असं सांगतानाच काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ असल्याची आठवणही रुपालीताई चाकणकर यांनी करुन दिली आहे.

सलग चार दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये काही दिवस सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत होती. विशेष म्हणजे 4 मेपूर्वी 23 फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची वाढ झाली होती. तर मार्चमध्ये तीन दिवस आणि एप्रिलमध्ये एक दिवस किंमतीत घट झाली होती.

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.57 रुपये प्रतिलीटर इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीमध्ये 99.25 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.38 रुपये इतका आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातमध्ये काळाचा घात, भरधाव ट्रकखाली चिरडून फूटपाथवर झोपलेल्या १३ मजुरांचा मृत्यू

News Desk

‘खेल ही नहीं, दिल भी जीतिए | वाजपेयी

swarit

#Coronavirus : आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीमला ममता बॅनर्जींचा विरोध

News Desk