HW News Marathi
Covid-19

शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंची भेट ! जवळपास ४० मिनिटे चर्चा, कारण गुलदस्त्यात

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाल्याचे वृत्त समोर येत आहे. आज (२६ मे) संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हे भेट झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार स्वतः या भेटीसाठी वर्षावर दाखल झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ४० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाला याबाबतची निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील आज झालेल्या चर्चेबाबत ज्या चर्चा सुरु आहेत त्यानुसार, राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती, केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारी मदत, राज्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय आणि त्याचसोबत राज्यातील मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा या विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी असे म्हटले जात आहे.

उद्या उद्धव ठाकरे अन् फडणवीसांपूर्वी संभाजीराजे घेणार शरद पवारांची भेट

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. नेहमी सामोपचाराने भूमिका घेणारे संभाजीराजे देखील या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसत आहे. २७ मे रोजी म्हणजेच उद्या संभाजीराजे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी संभाजीराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या बंगल्यावर सकाळी ९.३० वाजता ही भेट होणार आहे. त्यामुळे ह्यावर तोडगा निघणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला रणांगण बनवण्याचा भाजपचा प्रयत्न !

News Desk

अजित पवारांची मंत्रालयात गरज, मात्र मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरायला हवं !

News Desk

देशात कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला ६० लाखांचा टप्पा

News Desk