HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी पक्ष १ कोटी पत्र पंतप्रधानांना पाठवणार

मुंबई | मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस “एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी” ही मोहीम राबवत असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे आणि करत आहे. हाच धागा पकडत व पक्षाचा विचार लक्षात घेऊन वर्धापन दिनी ही मोहीम राज्यभर राबविली जात आहे असेही मेहबूब शेख म्हणाले.

‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे. आपण सुद्धा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी एक पत्र लिहावे असे आवाहन मेहबूब शेख यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारची इच्छा नसल्यामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही! – प्रीतम मुंडे

Aprna

रोहीत पवारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून केली ‘ही’ मागणी 

News Desk

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

News Desk