HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना १ लाख ६ हजार ७३१ कडुलिंबाची रोपे वाटण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना स्टेजच्या बाजूला गोंधळ सुरू झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा गोंधळ, ‘मुख्यमंत्री महोदय आता तुम्ही तर आम्हाला वाचवा’ अशा आशयाचा पोस्टर दाखवत मुख्यमंत्र्यांशी बोलायची केली मागणी, पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले

स्वच्छ वारी,स्वस्थ वारी, निर्मल वारी हरित वारी महाभियान अंतर्गत १ लाख ६ हजार ७३१ कडुलिंब रोपांचे राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांना वाटप करत विश्वविक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे सुद्धा उपस्तिथ होते. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले. तेव्हा मंचाच्या बाजूला काहीसा गोंधळ झाला. काही महिन्यांपूर्वी पुणे विद्यापीठातील रेफेक्टरीतील जेवणामध्ये सातत्याने अळ्या आढळून आल्या होत्या.

या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. त्यातच विद्यापीठाने रेफेक्टरी मध्ये जेवणासाठी नवी नियमावली तयार केली. नवे नियम जाचक असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी धक्काबुक्की झाली होती. विद्यापीठाने आंदोलनकर्त्या काही विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब – गोपीचंद पडळकर

News Desk

नाथाभाऊ पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, चंद्रकांत पाटलांचा विश्वास

News Desk

अनेक वादग्रस्त विधानांमुळे इंदुरीकर महाराज मोठ्या अडचणीत

swarit