मुंबई | NEET यूजी २०२० चा निकाल आज (१६ ऑक्टोबर) घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी १२ ऑक्टोबरला ट्वीट करत माहिती दिली होती. सुप्रीम कोर्टानं कोविड -१९ किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असे सांगितले होते.
नीट 2020 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी काय कराल? क
– सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
– यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
– त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
– नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
– आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या.