HW News Marathi
Covid-19

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रूग्ण महाराष्ट्रात आढळले

मुंबई | ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हायरसने जगाला धडकी बसली आहे. अशातच राज्यात या नव्या कोरोना स्ट्रेनचे रूग्ण आढळले आहेत. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लक्षणे दिसून आलेल्यांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती.

 

https://twitter.com/rajeshtope11/status/1346080435772690433?s=19

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींच्या प्रयत्नातून भिलईमधून राज्यात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल !

News Desk

कोरोना रुग्णाला खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास BMC ची परवानगी आवश्यक!

Aprna

देशात कोरोनारूग्णसंख्या २० लाखांच्या पुढे तर राज्यात ५ लाखांहून अधिक कोरोना रूग्ण !

News Desk