HW News Marathi
महाराष्ट्र

दिलासादायक बातमी! मुंबईत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांनी घट

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या २९१६ वर पोहोचली आहे. राज्यातील मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहेत. यामुळे मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे असून मुंबईतील वरळी कोळीवाडा आणि धारावी याभाग सील करण्यात आला आहे. यात दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये काल (१५ एप्रिल) ३५ टक्क्यांची घट झाल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील ट्वीट केले आहे.

मुंबईत काल १४० नवे कोरोना रुग्णा आढळून आले असून २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मुंबईत गेल्या ११ दिवसांत झालेल्या मृत्यूची ही सर्वात कमी आकडेवारी होती, जिथे आतापर्यंत ११४ मृत्यूची नोंद झाली आहे. पालिकेने गेल्या तीन दिवसांपासून टेस्टिंगचे मापदंड बदलल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून मुंबईत आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८९६ वर पोहचली आहे.

राज्यात करोनाचे रुग्ण वाढून २९१६ झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत १८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजला जाऊन आलेल्यांपैकी राज्यातील ५० लोकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात मुंबईमधील १४ जणांचा समावेश आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुढील २ दिवस मेघागर्जनेसह पाऊस होणार; हवामान विभागाचा इशारा

News Desk

दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी नितेश राणेंचे अमित शाहांना पत्र 

News Desk

कॉंग्रेसची विधान परिषदेची ऑफर उर्मिला मातोंडकरने नाकारली, कॉंग्रेसचा स्फोट

News Desk