HW News Marathi
महाराष्ट्र

“महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांनी मुलांना जन्म द्यावा”, नवीन तालिबानी फतवा

अफगाणिस्तान | अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांचं सरकार स्थापन झालं आहे. सरकार स्थापन केल्यानंतर तालिबान्यांनी नवीन फतवा काढला आहे. महिलांसंदर्भात तालिबानची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली आहे. तालिबाने यापुर्वी अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काबूलमध्ये पाकिस्तान विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर तालिबानने हवेत गोळीबार केल्याची घटना देखील घडली होती. यापुर्वी तालिबानने अफगाण महिलांना क्रिकेट सहित अन्य खेळांमध्ये भाग घेण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा तालिबाने महिलांसंदर्भात धक्कादायक निर्णय घेतला आहे.

तालिबान प्रवक्त्याने मुलाखतीदरम्यान सांगितले की, महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांनी फक्त मुलांना जन्म द्यावा. तालिबानचे प्रवक्ते सय्यद जकारुल्लाह हाशिमी यांनी नवीन अफगाणिस्तान सरकारमध्ये महिलांचा समावेश न करण्याबाबत टोलो न्यूजवर वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

तालिबान राजवाटीत अफगाणिस्तानमध्ये महिलांना प्रवासास, घराबाहेर पडण्यास बंदी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी लेखल्या जाते. तेथे महिलांवर होणाऱ्या अत्याचाबाबत जागतिक महिला आयोगाने देखील चिंता व्यक्त केली आहे. महिलांचे स्वतंत्र नष्ट करणारा आणखी एक निर्णय तालिबानने घेतला आहे.

एक महिला मंत्री होऊ शकत नाही

सय्यद जकारुल्लाह हाशिमी म्हणाला, “एक महिला मंत्री होऊ शकत नाही , हे असे होईल की तुम्ही त्यांच्या गळ्यात काहीतरी टाकले जे त्या घेऊ शकत नाहीत. महिलांचे मंत्रिमंडळात असणे आवश्यक नाही. त्यांनी मुलांना जन्म द्यावा. तसेच अफगाणिस्तानातील महिला आंदोलक देशातील सर्व महिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत.”

पण आम्ही त्यांना अर्धा भाग मानत नाही

महिला समाजाचा अर्धा भाग आहे, या प्रश्नावर हाशिम म्हणाला, “पण आम्ही त्यांना (आमच्यातील) अर्धा भाग मानत नाही. अर्धा काय प्रकार असतो? अर्ध्याची व्याख्याचं येथे चुकीची आहे. अर्ध्याचा अर्थ तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात ठेवता एवढाच होता. (निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो,) तसेच जर तुम्ही त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले तर, काही विशेष फरक पडत नाही. गेल्या २० वर्षांमध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानमधील सरकारबरोबरच येथील माध्यमांनी जे काही म्हटले आहे, त्याला कार्यालयांमध्ये वेश्याव्यवसायाशिवाय इतर कसली उपमा देता येईल?”

महिला त्या आहेत ज्या मुलांना जन्न देतात

हाशिमच्या उत्तरावर आक्षेप घेत मुलाखतकाराने तुम्ही महिलांवर वेश्याव्यवसायाचा आरोप करू शकत नाही, असे म्हटले यावर हाशिम म्हणाला, “मला सर्व अफगाणी महिलांवर आरोप करायचा नाही. अफगाणिस्तानमध्ये चार महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, त्या अफगाणिस्तानच्या महिलांचे प्रतिनिधित्व करु शकत नाहीत. अफगाणिस्तानच्या महिला त्या आहेत ज्या मुलांना जन्न देतात. त्यांना इस्लामिक नैतिकतेबद्दल शिक्षण देतात.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रा वाघ यांचा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश; ८० जणांच्या यादीत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश!

News Desk

फडणवीसांनी स्वत:ची नेमणूक विशेष अधिकारी म्हणून करावी…! – नवाब मलिक

Aprna

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्या; दत्तात्रय भरणेंच्या सूचना

Aprna