HW News Marathi
महाराष्ट्र

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक, कोर्टात करणार हजर

मुंबई | एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर आज (१७ जून) सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी

मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याची शक्यता असून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा ?

मूळचे उत्तरप्रदेश येथील आग्राचे असलेले प्रदीप शर्मा. १९८३ सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात शर्मा यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रवेश केला. शर्मा यांच्या कारकिर्दीला खरी धार चढली ती युतीच्या काळात. नव्वदीच्या दशकात डी कंपनी आणि इतर टोळ्यांमधील चकमकी (गॅंगवॉर) दिवसाढवळ्या होत होत्या. या गुंडांना आवर घालणं कठिण होऊन बसलं होतं. तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी शहीद विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा यांना गुन्हेगारी टोळ्या नामशेष करण्याचे आदेश दिले. त्यावेळी शर्मा यांनी तब्बल १०० च्या वर गँगस्टरचा खात्मा केला. शर्मा यांच्या नावाने अनेक गुन्हेगारांचा थरकाप उडायचा.

मात्र, लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक झाली आणि त्यांचे निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, ९ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांना न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. प्रदीर्घ काळानंतर सेवेत पुन्हा रूजू झालेल्या शर्मा यांची पकड आता कमी झाली असल्याचं बोलले जात असताना शर्मा यांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून दमदार कमबॅक केली. निलंबनानंतर पोलीस सेवेत आल्यानंतर त्यांचं मन फारसं रमलं नाही. त्यामुळेच शर्मा यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रदीप शर्मांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी झाली ते सुभाष माकडवाला या गँगस्टरशी झालेल्या चकचकीमुळे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे – सामना

News Desk

लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण, संजय राऊतांनी दिलं उत्तर

News Desk

मुख्यमंत्री पुन्हा एकदा घेणार श्रीरामांच दर्शन

swarit