मुंबई | उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तेच पुरावे पुन्हा शोधण्याची मोहीम एनआयएतर्फे राबविली गेली. बीकेसी येथील मिठी नदीत काही पुरावे नष्ट केल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानंतर एनआयएने या नदीमध्ये शोधमोहीम राबवली. यावेळी अनेक प्रकारचे साहित्य एनआयएच्या हाती लागले आहे.
बीकेसी येथील मिठी नदीतून संगणकाचे काही सुटे भाग, डीव्हीआर तसेच इतर साहित्य बाहेर काढण्यात बाहेर आले आहे. हा मोठा ऐवज हाती लागल्यानंतर आता मनसुख हिरेन मृत्यू आणि मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा उलगडा लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डीव्हीआर, सीपीयू सापडला
मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि मनुसख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सध्या या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत असून रोज नवनवे खुलासे होत आहेत. या दोन्ही प्रकरणांशी निगडीत असलेले सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही या तपासात समोर आले आहे.
हेच पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात एनआयएच्या हाती काही ठोस गोष्टी लागल्या आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरणारे डीव्हीआर, संगणकाचा सीपीयू आणि इतर काही गोष्टी एनआयएला सापडल्या आहेत. मिठी नदीत ही शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांसोबत सचिन वाझे हेसुद्धा उपस्थित होते.
एनआयएकडून कसून तपास
मनसुख हिरेन यांचा मृत्यू तसेच मुकेश अंबानी यांना धमकी दिल्याचा प्रकार घडल्यानंतर या दोन्ही प्रकाराशी निगडीत असलेले अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. तसेच या प्रकरणांच्या तपासासाठी मदत होणारे सीसीटीव्ही फुटेज साठवलेला डिव्हीआर, तसेच संगणकाचा सीपीयू नष्ट नदीत फेकण्यात आला होता. सचिन वाझे यांचे घर असलेल्या साकेत काँम्प्लेक्स या सोसायटीतील डीव्हीआरसुद्धा गायब होता.
त्यानंतर एनआयएने तपास मोहीम राबवत गायब असलेले डीव्हीआर शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मिठी नदीत एनआयएला डिव्हीआर आणि इतर सामान सापडले आहे. सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन डिव्हीआर शोधण्यात आला. दरम्यान, डीव्हीआर आणि सीपीयून सापडल्यामुळे एनआयएचे हे मोठे यश असून या दोन्ही प्रकरणांची लवकर उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Maharashtra: NIA takes Sachin Waze to the bridge over Mithi river in Mumbai's Bandra Kurla Complex in connection with the probe of Mansukh Hiren death case.
Divers have recovered a computer CPU, number plate of a vehicle, and other items from the river. pic.twitter.com/nIxN60tOU7
— ANI (@ANI) March 28, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.