HW News Marathi
महाराष्ट्र

निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड नेते, शिवसेनेकडून निलेश राणेंवर प्रतिहल्ला !

मुंबई | नाणार रायगडमध्ये होण्यासाठी चर्चा होत नसून तो राजापूरमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने १४०० एकर जमिनीचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. तसेच, नाणार रिफायनरी आणि बारसू एमआयडीसीमधील जमीन घोटाळ्यातील नावे जाहीर करणार असल्याचा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. निलेश राणेंच्या आरोपाला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते असून यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.

निलेश राणेंबाबत बोलताना विनायक राऊत यांनी म्हटलयं की, भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते निलेश राणे यांनी मोठा जावईशोध लावला आहे. नाणार रिफायनरीबाबतच्या बैठका मंत्रालयात आणि वर्षावर होतात, असा दावा राणेंनी केला आहे. मात्र, त्यांच्या या आरोपांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. त्यांनी केलेले आरोप बेछूट आणि पोरकटपणाचे आहेत. दुसरीकडे विनायक राऊतांना प्रत्युत्तर देताना निलेश राणे म्हणतात की , ‘खासदार विनायक राऊत यांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळं जगामध्ये कोणालाच किंमत नाही असं त्यांना वाटतं. माझ्यावरचा त्यांचा राग मी समजू शकतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.’

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात पहाटेची ॲापरेशन फसल्यानंतर सप्टेंबर महिन्यात ॲापरेशन कमळचा मुहुर्त भोंदू डाॅक्टरांनी दिलाय !

News Desk

परळीत एका महिलेचा खून; अवघ्या ४ तासांत आरोपी ताब्यात

News Desk

चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे, त्यांनी राग मानून घेऊ नये – जयंत पाटील  

News Desk