HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राला देशात कोरोनामध्ये एक नंबर वर नेणारा माणूस आमदार झाला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१८ मे) आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. पवारांनी मुख्यमंत्री केल्यानंतर राज्यपालांकडे भीक मागून स्वतःलाच उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध झाली नाही तर मी राजीनामा देतो सांगणारा । कधी ग्रामपंचायत सुधा न लढवलेला पण महाराष्ट्राला देशात कोरोनामध्ये एक नंबर वर नेणारा माणूस आमदार झाला. अशा शब्दांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे वर टीका केली आहे. ट्विटरवरुन त्यांनी अशी टिका केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर आठ आमदार आज (१८ मे) शपथ घेतली आहे. यात काँग्रेसचे राजेश राठोड, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे तर भाजपकडून रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतील. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण  

News Desk

दिलासादायक ! महाराष्ट्रातील पहिले दोन पाॅझिटिव्ह रूग्ण झाले निगेटिव्ह

Arati More

सरकार टिकवणे ही फक्त शिवसेनेचीच जबाबदारी नाही ! मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी

News Desk