HW News Marathi
Covid-19

शिवसेना आमदारांच्या कोरोना रिपोर्टमध्ये झोल झाला आहे का? – निलेश राणे

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी यावरही टीका केली आहे. सिंधुदुर्गमध्ये कोरोना रिपोर्ट उशिरा येतो मात्र तरीही शिवसेना आमदार यांचा रिपोर्ट येण्याआधी बातमी कोणी दिली? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारत शंका उपस्थित केली आहे.

“सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रिपोर्ट येतो रात्री ११-१२ वाजता. वर्तमानपत्रांची प्रिंटिंगची डेडलाईन साधारण ८ ते ९ किंवा कधीकधी १० वाजेपर्यंत असते. शिवसेना आमदार वैभव नाईकला कोरोना झाला आहे हे रिपोर्टच्या अगोदर बातमी दिली कोणी? ह्यात पण झोल जाल दिसतो. खरोखरच कोरोना झाला आहे की नाही”? असा प्रश्न आता आमदारांच्या कोरोना रिपोर्टवर निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

 

वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. लॉकडाऊनच्या काळात नाईक यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दौरा केला होता. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २१ जुलैला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात लॉकडाऊनमध्येच कोरोनाबाधितांचा आकडा का वाढला ? महापौरांनी सांगितले कारण  

Gauri Tilekar

‘लॉकडाऊन सुरू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार’, अनिल देशमुखांचा इशारा

News Desk

लॉकडाऊन तुर्तास नाही पण पूर्ण लॉकडाऊनचा मुख्यमंत्र्यांचा इशारा!

News Desk