मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या आत्महत्येची चौकशी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षावर भाजपकडून वारंवार टीका होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राज्य सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. मुंबईतील मालवणी पोलिसांनी दिशा सालियान प्रकरणाचा तपास केला होता. या तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकरच बंद केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
So the Disha Salian case is apparently goin to be closed becz there r no proofs found by the police!?
Then why was the IO changed twice? Y is Rohan Rai still absconding?
Y has her building watchman from that night disappeared?
Y is her PM report not out yet?
Contd..— nitesh rane (@NiteshNRane) November 13, 2020
दिशा सालियान प्रकरणाचा तपास पोलिसांना कुठलेही पुरावे न मिळाल्यानं बंद केला जाणार आहे का? मग तपास अधिकारी दोन वेळा का बदलण्यात आला? रोहन राय अद्यापही का फरार आहे ? त्या रात्रीपासून तिच्या बिल्डिंगचा पहारेकरी का गायब आहे? तिचा शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप का बाहेर आला नाही? असे प्रश्न आमदार नितेश राणे यांनी विचारले आहेत.
Someone from the forensic lab has shown me some details of the forensic report which clearly doesn’t show it was a case of suicide so why is the police rushing to close the case??
— nitesh rane (@NiteshNRane) November 13, 2020
त्याचबरोबर ‘त्या रात्रीचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासण्यात आलं का? कुठल्याही प्रकारचा तपास न करता पोलिस या प्रकरणाचा तपास का बंद करत आहेत? याबाबत काहीतरी शंकास्पद घडत आहे आणि त्यावर आम्ही बारिक लक्ष ठेऊन आहोत. या प्रकरणात पुढे काही पुरावे समोर आल्यास पोलिसांची नाचक्की होऊ नये,’असंही ट्वीट राणे यांनी केलं आहे. फॉरेन्सिक विभागातील एकाने मला काही कागद दाखवले. ज्यात ही आत्महत्या नसल्याचं स्पष्ट होतं. मग या प्रकरणाचा तपास बंद करण्याची घाई पोलिस का करत आहेत?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.
R the mobile tower locations of that night checked?
Y is the police in a hurry to shut the case without a investigation??
There is something fishy in all this for sure..N we r watching it very closely! Hope the police does not want to get embarrassed later if proofs come out!— nitesh rane (@NiteshNRane) November 13, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.