मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण तर लागलेच मात्र मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्याऱ्या घटनाही घडल्या. मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रणावतला माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलेच सुनावले आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असे निलेश राणे यांनी कंगनाला ठणकावून सांगितले आहे.
निलेश राणेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, 2/3 अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणौत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
2/3 अधिकारी प्रेशर मध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 3, 2020
ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.
https://twitter.com/KanganaTeam/status/1301031860546334720?s=19
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.