HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

सरकारकडून बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट दिले, निलेश राणेंचा आरोप

पुणे | बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही व्यक्तींना कोरोनासंबंधीच्या कामांची कंत्राटे देऊन ठाकरे सरकार स्वत:चे उखळ पांढरे करवून घेत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोव्हिड सेंटर्स पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. मात्र, सरकारने ही सेंटर्स बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही लोकांना चालवायला दिली आहेत. ज्यांचे चित्रपट कधी चालले नाहीत त्यांना आता कोव्हिड सेंटर आणि सॅनिटायझर तयार करण्याचे कंत्राट दिले जात आहे. बॉलीवूडमधील लोकांना फायदा मिळवून देण्यासाठीच ही कंत्राटे काढली जात असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

आज (२७ मार्च)  पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीवरूनही सरकारला लक्ष्य केले. राज्यात इमारती, रुग्णालय आणि मॉल्समध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. इमारतींमध्ये अग्निरोधक सुविधा उपलब्ध नसल्याने आगीवर नियंत्रण मिळण्यात अपयश येत असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फायर ऑडिटची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही हे फायर ऑडिट झालेले नाही. परिस्थिती बदलली नसल्याने आगीच्या दुर्घटनेत निष्पापांचे बळी जात आहेत. त्याची जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी निलेश राणे यांनी केली.

“जितेंद्र आव्हाडांना नैतिक अधिकार आहे का?”

फोन टॅपिंग प्रकरणावरुन रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत, असा आरोप करणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. जितेंद्र आव्हाड कुणाचे एजंट आहेत? जितेंद्र आव्हाडांना नैतिक अधिकार आहे का? घरात इंजिनिअरला खेचून आणत मारणारे हे मंत्री. तुम्ही महिलेवर आरोप करताय, तुमच्या आरोपाचा आधार काय? जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या संदर्भातला एकतरी पुरावा आहे का? काही आधार काय? असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. जितेंद्र आव्हाड कशामुळे हे बोलतात, तर त्यांना फुकटात मंत्रिपद मिळालं आहे. कुठेतरी आपली वळवळ असली पाहिजे, त्यासाठी जितेंद्र आव्हाडांचे हे प्रयत्न असल्याचा बोचरा वारही निलेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांवर केला आहे.

Related posts

राज्यात आज ७,८६२ नवे कोरोना रुग्ण आढळले, २२६ जणांचा झाला मृत्यू

News Desk

मुंबईची बत्ती गुल झाल्यानंतर आता केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार

News Desk

एकीकडे कोरोनाचे सावट, तर दुसरीकडे देशभरात पावसाची शक्यता

rasika shinde