HW News Marathi
महाराष्ट्र

“स्वत:ला जाणते समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही” – निलेश राणे

मुंबई | गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय इतिहासात मोठी उलथापालथ घडली, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपचं बिनसलं, त्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत येत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. मात्र या सत्तासंघर्षाच्या काळात ७२ तास खूप महत्त्वाचे ठरले, ते म्हणजे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेला पहाटेचा शपथविधी. यावरुन असा ही प्रश्न उपस्थित केला की, भाजपसोबत जाण्याचा निर्णय अजित पवार यांचा वैयक्तिक होता की शरद पवारांनीच तो प्लॅन रचला होता.

महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन वर्ष झाला आहे, मग या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे देवेद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादीकडूनच भाजपाला सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव आला होता, शरद पवारांसोबत चर्चा झाली होती, कोणाला कोणं खातं द्यायचं, पालकमंत्री कोण, महामंडळ वाटप कसं होणार? याबाबत सविस्तर चर्चा झाली होती, राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस हे सगळं शरद पवारांना माहिती होतं असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

यावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटमधून टीका केली आहे. निलेश राणे म्हणतात की, गद्दारी करून ठाकरे सरकारमध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही, हेराफेरी करणाऱ्यांना सुरूवातीला यश मिळतं, पण त्यांचा अंत वाईट असतो, स्वत:ला मोठे जाणते आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने एकदा स्वतंत्र लढून बघावे, ६०-६५ जागेवर समाधान मानावे लागेल, जयंत पाटील

News Desk

कोरोना काळात महाराष्ट्रात ६० कंपन्यांनी दीड लाख कोटींची गुंतवणूक केल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती!

News Desk

नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज! – छगन भुजबळ

Aprna