HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्यासाठी मुळात अब्रु असावी लागते”, निलेश राणेंची सरदेसाईंवर जहरी टीका

मुंबई | राज्यात सध्या सचिन वाझे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. भाजपकडून सरकारला निशाण्यावर धरण्यात आले आहे. या सगळ्या गोष्टी सुरु असताना राणे बंधूंनी मात्र युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना टार्गेट केले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी २ दिवसांपूर्वी सरदेसाईंवर टीका केली होतीच त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनीही तोफ डागली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सरदेसाई यांनी राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसाणीचा दावा केला आहे. हाच मुद्दा घेत माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर सरदेसाई आणि ठाकरे कुटुंबावर सडकून टीका केली आहे.

“ठाकरेंचा नातेवाईक वरून खालून सरदेसाई सारखा बेवडा, जूगारडा, मटका छाप म्हणतो अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किव्हा सोनू निगमला विचारा”, असा टोला निलेश राणे यांनी ट्विटरवर लगावला. निलेश राणे यांनी यापुढे जाऊन शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. “ठाकरे आणि त्यांच्या कुत्र्यांनी जास्त नाटक केलं तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्या महाराष्ट्राला सांगून टाकणार”, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणेही म्हणाले, ‘धमकी कुणाला देताय?’

वरुण सरदेसाई यांनी अब्रुनुकसाणीचा दावा केल्यानंतर नितेश राणे यांनी देखील निशाणा साधला. “अब्रुनुकसाणीचा दावा ठोकल्यानंतर धमकी नेमकी कुणाला देताय? आमची पार्श्वभूमी आणि शिक्षण हे सांगण्यासाठी आम्ही समाजकारण आणि राजकारणात नाही आहोत. अशा पद्धतीच्या नोटीसींना भीक घालत नाही”, असा घणाघात नितेश राणे यांनी केले.

वरुण सरदेसाईंनी पत्रकार परिषदेत म्हणाले होते?

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.

त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले होते.

Related posts

संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केंद्राचे काम तातडीने पूर्ण करा -अजित पवार

News Desk

आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार 

राज्याचा आकडा १६६६ वर, मुंबईत सगळ्यात जास्त कोरोनाबाधित

News Desk