HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात NCPला त्रास होण्यासारखं काय? – निलेश राणे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराचे भूमिपूजन होणार त्यावरून वादग्रस्त विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावरून राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. अनेक स्तरांतून, राजकीय नेत्यांकडून शरद पवारांवर टीका होऊ लागल्या. अशातच स्वतः कायम वादग्रस्त विधान करणारे भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी देखील पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका केली आहे. “पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता??? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात NCP ला त्रास होण्यासारखं काय??? असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे शरद पवारांना केला आहे.

इतकेच नव्हे तर, राज्यातील १३०९ डॉक्टर आंदोलन करणार आहेत, यावरूनही त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. “राज्यातील १३०९ डॉक्टर आंदोलन करणार आहेत. नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांची नाराजी आहे. राम मंदिरचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा पवार साहेबांनी राज्य सरकारवर लक्ष द्यावे. राज्य सरकारने अगोदरपासून गंभीरतेने घेतले असते तर महाराष्ट्र ह्या संकटात देशामध्ये १ नंबर नसता.” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

अशाप्रकारे राम मंदिराच्या वादावरून शरद पवार यांच्यावर टीका सुरू आहेत तर त्यांना अनेक उलट सुलट प्रश्न देखील विचारले जात आहेत.

Related posts

माणगाव एमआयडसीमध्ये एक लाख कोटींची गुंतवणूक, हजारोंना मिळणार रोजगारांची संधी

News Desk

महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला होणार सुरुवात

News Desk

गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेला ठोकल्या बेड्या

News Desk