नवी दिल्ली | गेल्या दोन टप्प्यांमध्ये कुटीर, लघु, मध्यम उद्योग, शेतकरी, नोकरदार, स्थलांतरीत मजुरांना दिलासा देण्यात आला आहे. आज अन्न प्रक्रिया उद्दोगांसाठी, शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यात आला आहे. शेतकरी ओला, सुका दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीला नेहमी तोंड देत असतो. यामध्ये फळे उत्पादन, डाळी, गहू, ऊस उत्पादक शेतकरी भरडला जातो. त्यांच्यासाठी लॉकडाऊनमध्ये काही पाऊले उचलण्यात आली आहेत. पीएम किसान योजनेतून १८५०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत. या काळात दुधाची विक्री कमी झाली. या योजनेतून ५००० कोटी रुपये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. याचा एकूण २००० कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला, असे सीतारामन यांनी सांगितले.
मत्स्यपालनासाठी मदत करण्यात आली आहे. १ लाख कोटी अॅग्रीगेटर, आयपीओ, कृषी संस्था, कृषी उद्योजक यांना शेतीची अद्ययावत उपकरणे, कोठारे बनवण्यासाठी देण्यात येणार आहे.
Government to immediately create a Rs 1 lakh crore Agri-Infrastructure Fund for farm gate infrastructure for farmers:
FM Nirmala Sitharaman pic.twitter.com/oimwGVZths— ANI (@ANI) May 15, 2020
समुद्री आणि देशांतर्गत मासेमारीच्या विकासासाठी सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणली आहे. यासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ५५ लाख लोकांना यातून रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
Govt to launch the Rs 20,000 crore Pradhan Mantri Matsya Sampada Yojana for development of marine and inland fisheries. 55 lakh people expected to get employment from this program: FM pic.twitter.com/wkbGVcyRCr
— ANI (@ANI) May 15, 2020
खुरकत रोगापासून पशुधन वाचवण्यासाठी १२ हजार ३४३ कोटी रपये देण्यात आले आहेत. तसेच, ५३ कोटी पशुधनाचे लसीकरण करम्यात येणार आहे. पशुपालन क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १५ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. याद्वारे दुग्धउत्पादन, स्टोरेज, डेअरी प्रक्रिया उद्योग, पशु खाद्य निर्मितीसाठी मदत मिळणार आहे. याद्वारे निर्यात करणाऱ्या कंपन्यांना इन्सेंटिव्हही दिला जाणार आहे.
National Medicinal Plants Board will bring 800-hectare area by developing a corridor of medicinal plants along the banks of river Ganga: FM https://t.co/EIoU5T0DdL
— ANI (@ANI) May 15, 2020
वनौषधीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या दोन वर्षात १० लाख हेक्टरवर वनौषधींचे उत्पादन घेतले जाईल. शेतकऱ्यांना यातून ५ हजार कोटीचे उत्पन्न मिळू शकतो असा अंदाज आहे.
Rs 4000 crore allocated for promotion of herbal cultivation; 10,00,000 hectare will be covered in the next 2 years: FM Sitharaman pic.twitter.com/vD4LcsAOO8
— ANI (@ANI) May 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.