मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. राज्य सरकारने मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) १००० खाटांचे खास कोव्हिड-१९ रुग्णालय आणि आयसोलेशन सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजुला मुंबईच्या सायन रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. वॉर्डमध्ये मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे. या व्हिडिओवरून राज्यातील आरोग्य विभाग, मुंबई पालिका आणि सरकारवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.
In Sion hospital..patients r sleeping next to dead bodies!!!
This is the extreme..what kind of administration is this!
Very very shameful!! @mybmc pic.twitter.com/NZmuiUMfSW— nitesh rane (@NiteshNRane) May 6, 2020
नितेश राणेंनी ट्वीटमध्ये शेअर केल्या व्हिडिओत,चार मृतदेह दिसत असून त्याशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे मृतदेह काळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगमध्ये बांधून ठेवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये काही डॉक्टर्स पीपीई किट परिधान करून रुग्णांवर उपचार करत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत.
So the dean of Sion hospital accepts the video n says the relatives don’t come 2 claim the bodies so v hv kept them there..
Wat shud v as Mumbaikers expect from the BMC after this ans?
Pvt hospitals r not accepting patients n Gov hospitals r in a mess!
It’s a medical emergency !— nitesh rane (@NiteshNRane) May 7, 2020
‘हा व्हिडीओ सायन रुग्णालयातला असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, काही जणांचे नातेवाईक मृतदेह नेत नसल्याने रुग्णालय प्रशासनाने ते वॉर्डमध्ये ठेवल्याचे त्यांनी सांगितले. या उत्तरानंतर मुंबई महापालिकेकडून आपण काय अपेक्षा करावी? खासगी रुग्णालये रुग्णांना दाखल करुन घेत नाहीत आणि सरकारी रुग्णालयांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. ही वैद्यकीय आणीबाणी आहे,’ असे ट्विट नितेश राणेंमध्ये लिहिले आहे.
सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे.
प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.
शासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.#CoronaInMumbai— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2020
नितेश राणेंनंतर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सायन रुग्णालयातील प्रकाणावर ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले, “सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.” फडणवीसांनी शेवटी हॅशटॅग कोरोना मुंबई दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.