HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी नितेश राणेंचे अमित शाहांना पत्र 

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. ही आत्महत्या नसून त्याची हत्या झाली आहे असा दावाही करण्यात आला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले. यानंतर कोर्टाने सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले.आता भाजप नेते नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.

या सर्व प्रकारात भाजप नेते नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाल्यानंतर हत्या करण्यात आली असं पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. आता आमदार नितेश राणेंनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्येचा तपास सध्या सुरु आहे. यात दिशा सालियनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा रोहन रॉय याची कुठलीही चौकशी मुंबई पोलिसांनी केली नाही. ज्या दिवशी दिशाचा इमारतीवरुन खाली पडली तेव्हा तिथे रोहन रॉय उपस्थित होता. दिशा खाली पडल्यानंतरही रोहन रॉय २०-२५ मिनिटांनी फ्लॅटमधून खाली आला होता त्यामुळे त्याच्या वागणुकीवर संशय निर्माण होतो.

Related posts

वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

News Desk

विनाकारण बाहेर निघाल तर निघेल गाढवावरून धिंड, गावकर्‍यांनी घेतला एकमुखाने निर्णय

विद्यार्थ्यांसाठी उद्योगक्षेत्राने कमवा व शिका योजना राबवा

News Desk