HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

“तर भाजप पिछाडीवरच अशीच पिछाडी कायम राहू दे!” – नितेश राणे 

मुंबई | राज्यातील ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज(१८ जानेवारी) सकाळी सुरु झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले असून, बहुतांश ठिकाणी भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले आहे. विशेष करून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात भाजपाच्या वाट्याला मोठं यश आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी खास प्रतिक्रिया देखील दिली आहे.

देवगड २३ पैकी १८, वैभववाडी १२ पैकी ९, कणकवली ३ पैकी १, मालवण ६ पैकी ५, कुडाळ ८ पैकी ४ ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. तरी देखील सिंधुदुर्गात भाजपा पिछाडीवर म्हणत असाल, तर भाजप पिछाडीवरच अशीच पिछाडी कायम राहू दे!” असं ट्विट करत नितेश राणे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

 

तर, “राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार. सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व.” असं या अगोदर ट्विट करून नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. आता निकालाच्या शेवटी कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Related posts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन !

News Desk

सर्व गोष्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आयपीसीमधील इतर कलमांचा उपयोग काय? राऊतांचा केंद्राला सवाल  

News Desk

…तोपर्यंत आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका !

News Desk