मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल ८२ लाख ५० हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “पेंग्विन आणि कंगना राणावतच्या प्रकरणातील वकीलांसाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे? आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील,” असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
Wow! Mumbaikers pay tax for..
1.)Penguins
2.)lawyers for Kanganas caseWhat else is left???
Inke baccho ki shaadi abhi humare hi paiso se hogi lagta hai!!
— nitesh rane (@NiteshNRane) October 28, 2020
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री कंगना राणावतने वांद्रे पाली हिल येथे माणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयात कंगनाने बेकायदेशीर बांधकाम केले होते. याच दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्याचे मुंबईत पडसाद उमटले होते. मुंबई महापालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी ३५४ कलमान्वये नोटीस दिली होती. या नोटीसीला योग्य उत्तर दिले नसल्याने पालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले होते.
कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले जात असताना कंगणाच्या वकिलाने आपण उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे निदर्शनास आणल्यावर तोडकाम थांबण्यात आले होते. कंगणाच्या बेकायदेशीर काम तोडण्यास उच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने कोणत्या वकिलाची नियुक्ती केली आणि त्यांना किती रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी मागितली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.