मुंबई | मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय काल (५ मे) सुप्रीम कोर्टाने दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र सरकारला टोलवला. त्यावरूनच आता भाजप नेते नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या आडून आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
भाजप नेते नितेश राणेंनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या एफबी लाईव्हवर टीकास्त्र सोडलं. आताच झालेल्या मुख्यमंत्री FB live नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया.. आदु… तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त.., असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरच निशाणा साधला आहे.
विशेष मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निकालानंतरही त्यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मुख्यमंत्री साहेब.. तुमच्या आदित्य किवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते. त्यांचे भविष्य कोणी अंधारात टाकले असते..तर..मग..मराठा आरक्षण नक्कीच टिकवले असते!!!, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
आताच झालेल्या मुख्यमंत्री FB live नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया..
आदु… तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त..
🤨🤨🤨
— nitesh rane (@NiteshNRane) May 5, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना पुढचा मार्ग दाखवलेला आहे. कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेलं आहे. माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना हात जोडून विनंती करतोय. आता हा अधिकार आपला आहे हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. आपण काश्मीरचं ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहिजेय, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारला आवाहन केलं आहे.
मराठा समाज हा सहनशील असला तरी आता जास्त वेळ न घालवता तात्काळ निर्णय घ्या
सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी जे दोन निकाल दिले होते. शाहबानो खटला आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट असेल. तोसुद्धा संसदेनं आपल्या अधिकारांचा वापर करून बदलला. आणि संवेदनशीलता दाखवली. मराठा समाज हा सहनशील असला तरी आता जास्त वेळ न घालवता तात्काळ निर्णय घ्यावा. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना मी विनंती करतोच आहे. उद्या त्यांना अधिकृत पत्रही लिहितोय. तिकडे येऊन भेटण्याची आवश्यकता असल्यास तीही आमची करायची तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतीचा अभ्यास तज्ज्ञांकडून सुरू आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.