मुंबई। शिवसेनेच्या अटक झालेल्या आणि चौकशी होत असलेल्या नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाची कशी जोडली जातात? सचिन वाझेंचे गॉडफादर कलानगर मध्ये आहेत काय ? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय. शिवसेना नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी जोडली जात आहे. या सगळ्यांमध्ये शिवसेना हीच कॉमन लिंक आहे.२०१९ मध्ये एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. सांगायचा मुद्दा हाच की शिवसेनेची या प्रकरणाशी काय कॉमन लिंक आहे. वाझेंचे गॉड फादर कलानगर ला बसले आहेत काय?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
How come every one who r either gettin arrested or investigated in the Antilia n Hiren murder case are directly or indirectly related to shiv Sena?
Can’t be a coincidence!!
And we still wondering who their godfather is??!!
It’s Uddhav Thackeray.— nitesh rane (@NiteshNRane) June 17, 2021
अनिल परबच वाझेंचे बॉस
सगळ्यांचा संशय एकाच दिशेने जात आहे यामागचा मास्टरमाईंड कलानगर ला बसला आहे एनआयएनएने डायरेक्ट कलानगर मधून चौकशी सुरू करावी. कलानगरात मनसुखचे मुख्य आरोपी आहे. तिथेच हेडक्वार्टर आहे, असा दावाही त्यांनी केला. अनिल परब हे वाझेंचे बॉस आहेत. तेव्हा अधिवेशनात परब वाझेंसाठी भांडत होते. मुख्यमंत्री देखील त्यांची बाजू घेत होते. वाझे काय लादेन आहे का? असं मुख्यमंत्री म्हणत होते. हिरेन प्रकरणी काम करत आहे. अधिवेशनात आम्हाला काय करायचं ते करूच. ज्या गोष्टी करणे गरजेच्या आहेत, त्या करणारच, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राऊत दोन पायांवर जाणार नाही
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर जुंपली होती. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता प्रसाद दिलाय, पुढे शिवभोजन थाळी देऊ असा इशारा भाजपला दिला आहे. त्यावरही राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, शिवप्रसाद देणाऱ्यांनी कधी घराबाहेरही यावे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊत यांची अवस्था काय झाली होती. हे नव्याने सांगायला नको राऊतांनी शिव भोजनाची भाषा करू नये मैदानात यावं. राऊत दोन पायांवर जाणार नाहीत हे मी ठामपणे सांगतो असा इशाराही राणे यांनी दिला आहे. मराठा समाज असो, ओबीसी असो की धनगर समाज असो. सर्वांना सरकारने नाराज केल आहे. ओबीसींचे आरक्षण उडवून लावले आहे. या सगळ्या गोष्टी अति होत चालल्या आहेत. मंत्र्यांच्या गाड्या फुटतील तेव्हा समाज किती नाराज आहे, हे कळेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.