मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जमीन मिळाल्यावर त्यांचं नक्की मत काय या सगळ्यावर याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून मोठं विधान केलं आहे. या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग
नारायण राणे यांच्या मुंबईतल्या बंगल्याबाहेर युवासैनिकांनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे या परिसरात वातावरण तंग झालं होतं. त्यानंतर संध्याकाळी युवा सेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. नितेश राणे यांनी हा फोटो ट्विट करत त्यावर भाष्य करताना हे मोठं विधान केलं आहे. याचा अर्थ पश्चिम बंगालप्रमाणे ही राज्य पुरस्कृत हिंसा होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्याची सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे. पण ते तर गुंडांचा सत्कार करताना दिसत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. त्यामुळे या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
So it was indeed a state sponsored violence just like West Bengal !
As a head of the state the CM shud be ensuring safety but he is actually felicitating hooligans!
State of affairs in Maharshtra!!
Presidents rule is the only way out to ensure safety from these thugs! pic.twitter.com/UH5RieArLo— nitesh rane (@NiteshNRane) August 25, 2021
युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक
युवासैनिकांनी राणे यांच्या विरोधात आंदोलन केल्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.’
युवासेना कोअर कमिटीने आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, मंत्री @AUThackeray जी यांची भेट घेतली. pic.twitter.com/eSNxdgtnXe
— Shivsena Communication (@ShivsenaComms) August 24, 2021
युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. आमदार नितेश राणे यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. यावेळी युवासेनेचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.