HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आता १७ जानेवारीला होणार सुनावणी

मुंबई | गेल्या १५ दिवसांपासून नॉटरिजेब असलेले भाजपचे आमदार नितेश राणे हे आज (१३ जानेवारी) अखेर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत हजेरी लावली. संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आता सोमवारी (१७ जानेवारी) होणार आहे. निकाल येईल तोपर्यंत नितेश राणेवर कोणतीही कारवाई करण्यास न्यायालयाचा मनाई केली आहे. 

नितेश राणे बँकेत दाखल झाल्यानंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. नितेश राणेंनी बँकेत हजेरी लावल्यानंतर कोणत्याही प्रश्नवर उत्तर देण्यात नकार दिला. तसेच नितेश राणे हे संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी १५ दिवसांपासून बेपत्ता होते. सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळाला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी नितेश राणेंनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्यॉव म्यॉव चिडवल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. तसेच या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान नितेश राणेंचं नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, राणेंचं डेरिंगबाज उत्तर

News Desk

#CoronaVirus : राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नयेत, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

swarit

एका पोलिसामुळे सरकारला फरक पडत नाही ! पवारांनी काढली भाजपची हवा

News Desk