HW News Marathi
देश / विदेश

‘आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री सगळेच टेन्शनमध्ये’, नितीन गडकरींची टोलेबाजी

जयपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमी नोकरशाही आणि सरकारी बाबूंकडून कामं करुन घेण्यासाठी ओळखले जातात. राजस्थानातील जयपूरमध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदावरुन बेधडक विधान केलं. जो मुख्यमंत्री बनतो, तो आपल्याला पदावरुन कधी हटवलं जाईल याचा अंदाज नसल्यामुळे टेन्शनमध्ये असतो, असं नितीन गडकरी म्हणाले. ते राजस्थानातील जयपूरमध्ये आयोजित संसद प्रणाली आणि जन अपेक्षा या कार्यशाळेत बोलत होते.

आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी

“समस्या सर्वांसोबत आहे, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी आहेत. मंत्री झाले तर चांगलं खात मिळालं नाही म्हणून दु:खी आहेत. ज्या मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं ते मुख्यमंत्री होऊ शकलो नाही म्हणून दु:खी आहेत. आणि मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नाही,” असं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं आहे.

“मला एका पत्रकाराने तुम्ही इतक्या मजेत कसे राहू शकता असं विचारलं होतं. मी सांगितलं, मी भविष्याची चिंता करत नाही. जो भविष्याची चिंता करत नाही तो आनंदी राहतो. एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे खेळत राहा. मी सचिन तेंडूलकर आणि सुनील गावसकर यांना लांब षटकार मारण्याचं रहस्य विचारलं होतं तेव्हा त्यांनी हा कौशल्याचा भाग असल्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे राजकारणदेखील कौशल्य आहे”.

भाजपकडून मुख्यमंत्री बदलाचा सपाटा

दरम्यान, भाजपने अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलाचा सपाटा लावल्याचं चित्र आहे. नुकतंच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री बदलले. त्याआधी उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याजागी तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. पण काहीच तासात त्यांनाही बदलून पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले. त्याआधी कर्नाटकात येडियुरप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आलं. तर तिकडे आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी हिमंत बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंद्रनील राजगुरू यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये केली घरवापसी

Darrell Miranda

भाजपला १ वर्षात ७५० कोटींच्या देणग्या, मात्र श्रीमंतीवर शिवसेना ५० वर्षांपासून मैदानात लढतेय!

News Desk

के. जी. बोपय्या यांच्या अध्यक्षतेखाली बहुमताची चाचणी

News Desk