HW News Marathi
Covid-19

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

मुंबई | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. देशात, राज्यात राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे.“काल मला अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरला याबाबत सांगितले. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मी सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे. मी सध्या विलगीकरण केले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा”, असे ट्वीट नितीन गडकरी यांनी केले आहे.

तसेच, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी देखील स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून माझी तब्ब्येत बिघडली होती. त्यामुळे मी कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. सध्या माझी प्रकृती ठिक आहे. गेल्या चार दिवसांपासून संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन अबू आझमी यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत रद्द केली भारतातून येणारी प्रवासी विमाने

News Desk

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो कि … ! वाझेंच्या आरोपांवर अनिल परबांचे स्पष्टीकरण

News Desk

देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरू केले जाणार

News Desk