HW News Marathi
महाराष्ट्र

‘देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती’, नितीन गडकरींचं भाजप नेत्यांना महत्वाचं आवाहन

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप नेते, कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती केली आहे. कोरोना काळात आधी स्वत:ची तब्येत सांभाळा, कुटुंबियांना जपा आणि शक्य होईल तसं सगळी कामं ऑनलाईन करा, असं आवाहन गडकरी यांनी केलं आहे. त्यामुळे आता भाजप नेते, कार्यकर्ते त्याचं ऐकणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावरुन गडकरी यांनी फडणवीसांना प्रेमळ सल्ला दिलाय. ‘देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत’, अशा शब्दात गडकरी यांनी फडणवीसांना दौरे टाळण्याची विनंती केली आहे.

‘आपला जीव वाचला तर पुढे काही करता येईल’

आता अन्य रस्ते, पुल, पक्षाची जी कामं असतील ती महत्वाची आहेतच. पण ती कामंही घरुन घरा. आता येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांना गमावणं हे आपल्याला परवडणारं नाही. ही पार्टी वगैरे जी काम आहेत ती महत्वाची आहेत. पण आधी आपला जीव वाचला तर पुढे काही करता येणार आहे. त्यामुळे आता पहिली प्रायॉरिटी ही आपला जीव, आपलं कुटुंब. दुसरी आपल्या घराच्या सगळ्या आर्थिक व्यवस्था आणि मग तीसरी प्रायॉरिटी आपला पक्ष, समाज. भावनेच्या भरात आपण अनेक बाबी विसरुन जातो. पण तसं करुन चालणार नाही, असं आवाहनही गडकरी यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना केलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉक्टर दिनाच्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

News Desk

मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू

Aprna