HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं ही साधी बाब नाही, म्हणून घातपाताची शक्यता वर्तवली, उर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई | मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असे ट्विट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले होते.त्यानंतर आता नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटसंबंधी पत्रकारांशी बोलताना मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही, त्यामुळेच आपण घातपाताची शक्यता वर्तवली असल्याचं म्हटलं आहे. ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. “मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही आणि तुम्हीसुद्धा ते समजू नये. म्हणूनच याच्यामध्ये निश्चितच घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं. काही लोक खासकरुन ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीकोनातून काहीही घडू शकतं. ते पडताळून पाहणं राज्याचं ऊर्जा मंत्री या नात्यानं माझं काम आहे, ते मी करतोय,” असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

“संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे. ही तांत्रिक समिती असेल. एका आठवड्यात रिपोर्ट आल्यानंतर जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल. कोणालाही सोडणार नाही. केंद्र सरकारचं तांत्रिक पथक आपलं काम करत आहे. सरकार काही मदत करु शकतं का याबद्दल चाचपणी करत आहेत,” अशी माहिती नितीन राऊत यांनी यावेळी दिली. तांत्रिक ऑडिटही केलं जाणार असून समिती त्यासंबंधीही माहिती घेणार असल्याचं त्यांनी सागितलं आहे. ८ तासात होणारं काम आमच्या विभागाने तीन तासात केलं आमि मुंबईला पूर्वपदावर आणलं असं सांगत नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक केले आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता 

News Desk

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीदरम्यान दोन गटात बाचाबाची

News Desk

राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका

News Desk