HW News Marathi
महाराष्ट्र

पदोन्नतीतील आरक्षणावर तोडगा निघणार, तो जीआर रद्द होणार – नितीन राऊत

मुंबई | राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणारा 7 मे रोजी काढलेला जीआर रद्द होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कायदेशीरबाबींचा अभ्यास करून या प्रश्नावर तोडगा काढणार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज (१जून) पदोन्नतीतील आरक्षणाबाबत बैठक झाली.

या बैठकीनंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पदोन्नतीतील आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एक विशेष बैठक झाली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून या प्रश्नावर निश्चितच तोडगा निघेल याची मला खात्री आहे, असं राऊत म्हणाले.

अजित पवारांसोबतची चर्चा सकारात्मक झाली

7 मे चा जीआर रद्द होईल. याबाबतची सरकारची भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे. या संदर्भात कायदेशीर अभ्यास करायचं ठरवलं आहे. कायदेशीर बाबी अनेक आहेत, तशाच इतरही अनेक बाबी आहेत आणि सकारात्मक निर्णय होईल. तीन पक्षाचे सरकार आहे. आता फक्त निर्णयाप्रत पोचायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. 21 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे थोडासा पेच निर्माण झालेला आहे. तरी या याबाबतचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय सकारात्मक असेल, असं ते म्हणाले.

मी नाराज नाही – नितिन राऊत

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या आरक्षणावर भर देऊन ते कसं कार्यान्वित करता येईल या विषयी आज चर्चा झाली. कायदेशीरबाबीही तपासल्या जात आहेत, असं सांगतानाच या मुद्द्यावरून मी नाराज नाही, असं नितिन राऊत स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…म्हणून ईडीसमोर हजर राहू शकत नाही’, अनिल परब यांनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

मंत्री गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजनांच्या घरी!

News Desk

महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे – संजय राऊत

News Desk