HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा एकही पोसिटीव्ह रुग्ण नाही | आरोग्यमंत्री

मुंबई | जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव करण्यास सुरुवात झाली आहे. “कोरोना व्हायरसचा एकही पोसिटीव्ह रुग्ण राज्यात आढळलेला नाही,” अशी माहिती राज्याचे आरोग्या मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच मुंबई आणि पुण्यात कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आहे. आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच कोरोना व्हायरससाठी राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे, असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी आज (४ मार्च) विधीमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलताना सांगितेल.

तसेच “मुंबई आणि पुण्यात जे कोरोनाचे संशयत आहेत. या दोघांचेही रिपोर्ट अद्याप आलेले नाही. त्यामुळे राज्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही. आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे. कोरोना व्हायरससाठी राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज, असल्याचेही माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.” नागरिकांनी आरोग्याची आणि स्वछतेची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी दिले आहे.

कोरोनामुळे जभरात ३ हजारहून जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना व्हायरसचे ६ रुग्ण भारतात अढळून आलेआहे. इटली, इराण जापान, दक्षिण कोरिया नागरिकांचा व्हिजा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी उद्या (४ मार्च) मुंबई महापालिकेने तातडीचे बैठक बोलविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय!

News Desk

राज्यातील ८४६ शाळांचा ‘पीएम श्री’ योजनेत सर्वांगीण विकास करणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

Aprna

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC परीक्षांची तारीख केली जाहीर

News Desk