HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार अन् राजकीय सहभाग झालेला नाही! – अजित पवार

पुणे | “पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. जम्ब कोविड सेंटरमध्ये कोणताही राजकीय सहभाग नाही,” असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी केला. अजित पवार यांनी आज (१२ फेब्रुवारी) पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलता ते म्हणाले. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे काम पारदर्शक आहे, असे अजित पवारांनी नमुद केले. पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

अजित पवार म्हणाले, “राज्य सरकार, जिल्हा वार्षिक योजना आणि पालिकेचा हे जम्बो कोविड सेंटर असतात. पुण्यातील सीओपीच्या मैदानामध्ये दोन कोविड सेंटर उभे करण्यात आली असून यात जम्ब कोविड सेंटरमध्ये कोणताही राजकीय सहभाग नाही. कोविड सेंटरचे काम हे पारदर्शकपणे  करण्यात आले असून यात कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाही, असे ते म्हणाले. पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला असून यांचे १०० कोटी कॉन्ट्रॅक्टर एका चहावाल्याला दिला. हा चहावाला के. एम. हॉस्पिटलचा पाठीमागेचा सह्याद्री नावेर हॉटेल चलवितो, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. 

पुण्यातील १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासंदर्भात पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “१५ ते १८ वयोगटातील मुलांनी आतापर्यंत कोव्हॅक्सिनचे डोस दिल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु, कोव्हॅक्सिनच्या लसचा पुरवठा कमी आहे. तर पुण्यातील शाळा सुरू झाल्यानंतर लसीकरणाची पुन्हा सुरु करता येत नाही. तसेच ग्रामीण भागात चांगले लीसीकरण झाले आहे. परंतु, पुणे आणि पिंपरी चिंचवडला कमी झाले आहे. तसेच सध्या स्थिती पुण्यात कोरोनाची परिस्थिती अटोक्या आली असून राज्यातील कोरोनाचा पॉझिटीव्ही रेट ८ टक्के असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

शिवजयंती शिवनेरीवर होणार – अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवनेरी किल्ल्यावर साजरी होणार असून मुख्यमंत्र्यांशी बोलून कोरोना नियमात शिथिलता अणणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तसेच शिवजयंतीला मी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितल. मुख्यमंत्र्यांना प्रवास करण्यास मनाई केल्यामुळे ते शिवजयंतीच्या कार्यक्रमला उपस्थित राहणार नाही, असे ही ते यावेळी बोलत होते.    

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड तालुक्यातील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार; पुनर्वसनाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्याचे निर्देश

Aprna

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

Aprna

फडणवीसांनी दिलेली माहिती धादांत चुकीची, जनता भीक घालणार नाही, जयंत पाटील यांचा टोला

News Desk