HW News Marathi
Covid-19

पुणेकरांनो लॉकडाऊन होणार नाही मात्र निर्बंध कडक केले जाणार!

पुणे | पुणेकरांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्णय आज (२ एप्रिल) अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत होती. त्यामुळेच आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन होणार नाही मात्र निर्बंध कडक केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

तर दुसरीकडे राज्यातील एकूण कोरोना स्थितीचा आढावा घेण्य़ासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर ४.३० वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. यात राज्यात लॉकडाऊन केला जाणार की निर्बंध कडक केले जाणार यावर चर्चा होणार असल्याचं समजत आहे. तर दिल्लीतही आज एक महत्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात या बैठकांनंतर काय निर्बंध लावले जाणार? की काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

गेल्या २४ तासात देशात तब्बल ८१ हजार ४४६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाखांवर पोहोचली आहे. एका दिवसात नोंद होणारी ही गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. याआधी ११ ऑक्टोबरला ७४ हजार ३८३ रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या २४ तासात ५० हजार ३५६ जण उपचारानंतर बरे झाले असून ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ३ हजार १३१ इतकी झाली आहे. तर १ कोटी १५ लाख २५ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ६ लाख १४ हजार ६९६ अॅक्टिव्ह केसेस असून मृतांच्या संख्या १ लाख ६३ हजार ३९६ इतकी झाली आहे. दुसरीकडे देशात आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

Aprna

मुंबई महापालिकेची होळी आणि धुलिवंदनसाठी नियमावली जारी

News Desk

“ कोरोना बाबतीत अफवा पसरवणाऱ्यांची संपत्ती जप्त करा”

News Desk