HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्यात सध्या कोणतेही निर्बंध आणि लॉकडाऊन नाही”, राजेश टोपे

जालना | आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात जरी निर्बंध शिथिल केले असले तरी देखील तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. मात्र लोकडोवनची तूर्तास गरज नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. जालनामध्ये ते बोलत होते.

अकोल्यातील चिमुकलीला रक्तपेढीतील रक्तातून एचआयव्हीची बाधा झालीय.या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असून या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. रक्तदात्याकडून रक्त घेताना त्याच्या रक्ताची तपासणी केली नव्हती का.?आणि हे रक्त खाजगी दवाखान्यात त्या चिमुकलीला देताना तेव्हाही रक्ताची तपासणी करण्यात आली की नाही याबाबत चौकशी करण्यात येत आहे.

दोन ते तीन दिवसांत या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती टोपे यांनी दिलीय.अशा घटना समोर आल्यानंतर एसबीटीसीकडून त्वरीत कारवाई केली जाते असंही त्यांनी सांगितलं.ज्यावेळी राज्यात ७०० मॅट्रिक टन पेक्षा अधिक ऑक्सिजन लागेल त्यानंतरच राज्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध लावले जातील असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी पोलीस विकतायंत तिकिटे

News Desk

दिलासादायक ! मुंबईला निसर्ग चक्रीवादळाचा धोका नाही। स्कायमेट

News Desk

पुणे पदवीधर मतदार संघातून कोण लढणार? शौमिका महाडिक यांची प्रतिक्रिया…

News Desk